उद्धव ठाकरेंना आव्हान देणाऱ्या राणांना शिवसेनेने दिल ‘हे’ ओपन चॅलेंज

अमरावती – अमरावतीच्या(Amarvati) खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज लीलावती रुग्णालयातून(Lilavati Hospital) डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी यांनी सिंहगर्जना केली. यावेळी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.तसेच त्यांनी इतर मुद्द्यावरून देखील शिवसेनेवर(Shivsena) हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघात निवडणूक लढवावी, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढीन, असं राणा म्हणाल्या आहेत. एवढंच नाहीतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये दम असेल, तर माझ्याविरुद्ध कोणत्याही जिल्ह्यातून लढून दाखवा. मी तुमच्याविरोधात निवडणूक लढणारच आहे. नारीशक्ती काय असते हे तुम्हाला दाखवून देऊ. तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही,” असं नवनीत राणा म्हणाल्या.

यावर अमरावती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे (Sunil Kharate) यांनी उत्तर देत राणांना ओपन चॅलेंज दिलं आहे. ”खोट्या जातप्रमाण पत्राच्या आधारे खासदारकी मिळवणाऱ्या नवनीत राणांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अमरावती मतदार संघातून कोणत्याही साध्या शिवसेना पदाधिकाऱ्याच्या विरोधात निवडणूक लवढून अपक्ष तरी निवडून येऊन दाखवावं, असं ओपन चॅलेंज सुनील खराटे यांनी दिलं आहे. नवनीत राणांना अमरावतीच्या जनतेचा विश्वासघात करुन आता भाजपची साथ धरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोलण्याची पात्रता नसताना त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी आणि भाजपच्या सांगण्यावरून त्या बोलत आहे, असा आरोप सुनील खराटे यांनी यावेळी केला.