अबकी बार हजार पार… हे नाही गरिबाचे सरकार; शिवसेनेची मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी

Pune : नको रे बाबा… मोदी सरकार, उध्वस्त केले….आमचे संसार,अबकी बार हजार पार… हे नाही गरिबाचे सरकार, मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा देत वाढती महागाई विरोधात मोदी सरकारचा निषेध पुण्यात शिवसेने केला. येरवडातील इंदिरा चौकात शिवसेना, युवा सेनेच्या वतीने बुधवारी हे आंदोलन करण्यात आले.(shivsena protest)  यावेळी महिलांना गॅस ची तिरडी काढून चुलीवर स्वयंपाक केला. तर शिवसेने च्या वतीने महिलांना चुलिचे वाटप देखील करण्यात आले.

पेट्रोल डिझेल सोबतच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात भरमसाठ वाढ होत आहे. या वाढत्या महागाईच्या निषेधार्थ तसेच मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी येरवडात पुणे, उपशहर प्रमुख आनंद गोयल (Anand Goyal)  व उपशहर प्रमुख  प्रशांत राणे यांच्या नेतृत्वाखाली महागाईचा तिव्र विरोध करण्यात आला.

यावेळी आंदोलनात पुणे शहर प्रमुख गजानन थरकूडे, संजय मोरे, अविनाश साळवे, पाला मोरे, सचिन भगत, सागर माळकर, सुनील जाधव, राजाभाऊ चौधरी, मकरंद पेटकर, राजेंद्र शिंदे, युवा सेनेचे युवराज पारिख, सनी गवते, मंगेश साळसकर, अक्षय माळकर, महिला आघाडीच्या योगिता शिर्के, शुभदा भगत, विमल सुक्रे, अंबिका बुधारप, शारदा मठपती, अनिता परदेशी, हरिभाऊ सपकाळ, राजु सावंत, सतिश मुळिक, शंकर संगम, राहूल शेंडगे,बापू खरात, शिवाजी वडघुळे, सचिन भगत, शरद गुप्ते, बाळासाहेब शेंडगे, सोमनाथ रवादबे, अजय वाल्हेकर, संजय मोझे, ज्ञानेश्वर पोळ, प्रशांत राजे, मनिष बासू, रणजित शिंदे, आबा खलसे, अजय शास्त्री यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोदी सरकारने मोठं मोठ्या घोषणा केल्या मात्र प्रत्यक्षात काही फायदा सामान्य जनतेला त्याचा झालेला नाही. आता घरघुती गॅसच्या दरात देखील भरमसाठ वाढ करण्यात आल्याने आज मोदी सरकारचा निषेध करण्यात आल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पेट्रोल, डिझेल, गॅस दर असतील किंवा भाजीपाला या सगळ्यात वाढ झाली असून त्याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शिवसेना पक्ष तळागाळातील नागरिकांसाठी झटणारा पक्ष आहे. त्यांच्या समस्यांची जाणीव असल्याने हे आंदोलन करण्यात आले. मोदी सरकार कोणत्या पद्धतीने काम करत नाही. अनेक युवक हे बेरोजगार झाले आहेत. त्यांच्यासाठी काहीच हे सरकार करत नसून त्यांचा निषेध आज शिवसेनेच्या वतीने करण्यात आले.