शिवसेनेचं वाटोळं अटळ आहे; निलेश राणे यांचे भाकीत 

मुंबई – राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण विरोधी पक्षातील नेत्यांवर सत्ताधारी मंडळींकडून हल्ले करण्यात येत असल्याचे वारंवार समोर येत आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (MP Navneet Rana and MLA Ravi Rana) यांना पोलिसांनी  अटक  केल्यानंतर  त्यांना भेटायला आलेले भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला.

त्याआधी भाजप नेते मोहित कंभोज ( BJP leader Mohit Kambhoj ) यांच्यावर देखील शिवसैनिकांनी हल्ला केला होता. याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला झाला होता सोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांच्या गाडीवर सुद्धा चप्पलफेक करण्यात आली होती. या सर्व घडामोडी घडत असताना भाजप नेते निलेश राणे ( BJP leader Nilesh Rane) यांनी टीकास्त्र सोडले आहे.

राणा, कंभोज, सोमय्या यांची बाजू घेतली कि परप्रांतीयांची बाजू घेतली पण शिवसेना राणे, दरेकर, लाड, शेलार यांच्यावर खोटी कारवाई करते तेव्हा मराठीचा मुद्दा येत नाही. ठाकरे सरकारवाल्यांनो आता तरी सुधरा सत्ता गेल्यावर हे सगळं भारी पडणार तुम्हाला. शिवसेनेचं वाटोळं अटळ ( Shiv Sena’s struggle is inevitable ) आहे.