शिवस्मारक केवळ घोषणांपुरते! महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान थांबवा! शरद पवार पक्षाची निदर्शने

शिवस्मारक केवळ घोषणांपुरते! महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान थांबवा! शरद पवार पक्षाची निदर्शने

Sharad Pawar Party | छत्रपती शिवाजी महाराजांच्या 19 फेब्रुवारी 2025 च्या शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला, शिवस्मारकाच्या रखडलेल्या कामाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार तर्फे गिरगाव चौपाटी येथे निदर्शने करण्यात आली.मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा गाजावाजा सरकारने मोठ्या दिमाखात केला, मात्र प्रत्यक्षात आठ वर्षांनंतरही स्मारकाचे काम सुरू झालेले नाही.

शिवस्मारक आठ वर्षे फसवाफसवी आणि केवळ आश्वासनं! २०१६ तत्कालीन भाजप सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जलपूजन. २०१८ स्मारकाच्या कामासाठी एल अँड टी कंपनीला निविदा मंजूर २०१९ सामाजिक संस्थेच्या याचिकेमुळे सर्वोच्च न्यायालयात कामावर स्थगिती २०२१ सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राथमिक खोदाई आणि दगड अभ्यास पूर्ण केला.२०२४ आठ वर्षे उलटली, स्मारकासाठी अजूनही एक वीट रचली नाही!

सरदार पटेलांचे स्मारक पाच वर्षांत पूर्ण होते, पण शिवस्मारक का रखडले?
जलपूजन आणि भूमिपूजनासाठी ८ कोटी खर्च, आराखड्यासाठी ३६ कोटी खर्च – तरीही प्रत्यक्ष काम शून्य!सरकार शिवरायांच्या नावावर फक्त जाहिराती करते, पण शिवस्मारकासाठी ठोस पावले उचलत नाही.

आमच्या ठाम मागण्या शिवस्मारकाच्या कामाला त्वरित सुरुवात करावी.स्मारक प्रकल्पाची संपूर्ण माहिती आणि प्रगती महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडावी.निधीचा हिशोब सार्वजनिक करावा – ४४ कोटी रुपये कुठे खर्च झाले? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते व युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी केला.
न्यायालयात सरकारकडून प्रभावी पाठपुरावा करावा, जेणेकरून स्मारकाचा अडथळा दूर होईल.
महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा अपमान आम्ही सहन करणार नाही!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (Sharad Pawar Party) प्रवक्ते ॲड. अमोल मातेले म्हणतात, “भाजप सरकारने शिवस्मारकाच्या मुद्द्यावर केवळ फसवाफसवी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात योग्य पाठपुरावा केला गेला नाही, परवानग्यांचे तांत्रिक दोष दुरुस्त केले नाहीत. मग आठ वर्षांपूर्वी जलपूजन कसे केले?”

“नरेंद्र मोदींनी सरदार पटेलांचे स्मारक पाच वर्षांत पूर्ण केले, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आठ वर्षे का लागली? हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे!”हा केवळ शिवभक्तांचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे!

जर सरकारने त्वरित निर्णय घेतला नाही, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार शिवभक्तांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन उभारेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

महायुती सरकारमध्ये वाद! एकनाथ शिंदें का सुरू करणार आहेत स्वतःचे वैद्यकीय मदत केंद्र

“मुंबईत न्यू इंडिया बँक लुटली त्याच्यात भाजपचे लोक”, संजय राऊत यांचा मोठा दावा

मुंबईत कोळसाभट्टीवरील तंदूर रोटीवर बंदी, BMCची कडक कारवाईचा इशारा

Previous Post
तुमच्याकडे परिवारवाद तर आमचा महाराष्ट्रवाद!, शिंदे यांचा रत्नागिरीतून उबाठावर हल्लाबोल

तुमच्याकडे परिवारवाद तर आमचा महाराष्ट्रवाद!, शिंदे यांचा रत्नागिरीतून उबाठावर हल्लाबोल

Next Post
सचिनची निवृत्ती ठरली ‘तेंडल्या’चे कारण

सचिनची निवृत्ती ठरली ‘तेंडल्या’चे कारण

Related Posts
बाईच्या हातात फक्त पाळण्याची दोरी असावी राजसत्तेची दोरी नसावी हा विचार मनुवादी आहे - Sushma Andhare

बाईच्या हातात फक्त पाळण्याची दोरी असावी राजसत्तेची दोरी नसावी हा विचार मनुवादी आहे – Sushma Andhare

Sushma Andhare | संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या संकल्प सभेत वसंत देशमुख…
Read More

‘राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपाचा प्रयत्न नाही, नेतृत्वावरील नाराजीमुळे तो पक्ष स्वतःहून बुडेल’

Mumbai – भारतीय जनता पार्टीकडून (BJP) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) किंवा काँग्रेस पक्ष (Congress) फोडण्याचा कोणताही प्रयत्न होत नाही.…
Read More
Video: सचिन तेंडुलकरने कुटुंबासह घेतले मुकेश अंबानींच्या घरी बाप्पाचे दर्शन!

Video: सचिन तेंडुलकरने कुटुंबासह घेतले मुकेश अंबानींच्या घरी बाप्पाचे दर्शन!

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीचा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. जो प्रत्येक भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या…
Read More