शिवसृष्टी हा शिवरायांचा जीवनप्रवास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प – सिंधिया

पुणे :- ओजस्वी वाणीतून महाराष्ट्रातील घराघरांत शिवचरित्र पोहोचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वप्नातील शिवसृष्टी प्रकल्पाला केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री ज्‍योतिरादित्‍य सिंधिया यांनी काल 2 सप्टेंबर 2022, शुक्रवार रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित  शिवसृष्टी थीम पार्क कसे असेल याची चित्रफीत पहिली.

यावेळी ते म्हणाले, शिवरायांचा जीवनप्रवास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यातून मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे पुन्हा दर्शन घडेल. ते म्हणाले मराठा माणूस म्हणून माझा संकल्प असून या प्रकल्पासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत राहू असं ते म्हणाले.

ते म्हणाले, मी छत्रपती शिवाजी महाराज (मराठा ) आमचे पूर्वज असल्यामुळे हा क्षण माझ्यासाठी भावनात्मक आहे. मी मराठा माणूस असल्यामुळे, हिंदवी स्वराज्याची विचारधारा असणारे छत्रपती शिवाजी महाराजांची जी कल्पना होती ती साकारू. हि एक भावनात्मक गोष्ट प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आणि आत्मा मध्ये आहे असं ते म्हणाले.