Shivajirao Nalawade : मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी

Shivajirao Nalawade :- मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिवाजीराव नलावडे (Shivajirao Nalawade) यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज जाहीर केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार आज मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांच्या नावाची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली.

शिवाजीराव नलावडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आणि मुंबई जिल्हाध्यक्ष राहिले असून मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. त्यांचे सहकार चळवळीतही योगदान मोलाचे आहे.

महत्वाच्या बातम्या :

Atul Londhe | राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला, गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे का नाही?

Ajit Pawar | निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये

Pramod Bhangire | पुण्यातील रात्री उशिरापर्यंत चालणारे पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करा, प्रमोद भानगिरेंची मागणी