‘अचलपुरातील दुल्ला प्रवेशद्वारावर भगवा लावणे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात गुन्हा आहे का ?’

अमरावती – अचलपुरातील दुल्ला प्रवेशद्वारावर (Achalpur dulla entrance) भगवा लावणे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात गुन्हा आहे का,असा संतप्त सवाल भाजपाचे(BJP) महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी (Shivray Kulkarni) यांनी विचारला आहे. अचलपूर मध्ये गठ्ठा मतपेटीसाठी दंगेखोरांना अभय आणि निरपराध तरुणांना शिक्षा देण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

काल रात्री हिंसाचार ( Violence) झालेल्या अचलपूरला आज भेट देण्यासाठी गेले असता भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी व भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता दीघडे(Nivedita Didghe) यांना पोलिसांनी शहराबाहेर नाक्यावरच ताब्यात घेतले व आसेगाव पोलीस ठाण्यात अडवून ठेवले. अचलपुरात पोलीस पक्षपाती कारवाया करत आहेत. दुल्ला गेट वर भगवा लावताच दोन हजाराचा सशस्त्र जमाव तात्काळ येतो, यावरून ही घटना पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होते असं कुळकर्णी यांनी म्हटले आहे.

12 नोव्हेंबर रोजी अमरावतीत रझा अकादमी (Raza acadamy) ने केलेल्या हिंसाचाराचा प्रत्यय काल पुन्हा जिल्ह्यात अचलपूर येथे दिसून आला आहे. अशा पूर्वनियोजित घटनांच्या वेळी पोलीस बघ्याची भूमिका घेतात, ही पुन्हा दिसले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर गठ्ठा मतपेटीला (Ballot Box)डोळ्यासमोर ठेऊन निरपराध लोकांवर कारवाई केली जात आहे, अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.