२०१९ साली भाजपमुळेच युती तुटली त्याला शिवसेना जबाबदार नाही – राऊत

नवी दिल्ली – शिवसेनेच्या 12 खासदारांनी एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्याची घोषणा काल केली.या 12 खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली,आणि लोकसभेतील गटनेता म्हणून राहुल शेवाळे, तर मुख्य प्रतोद म्हणून भावना गवळी यांची नेमणूक करण्याची विनंती केली.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या खासदारांमध्ये राहुल शेवाळे आणि भावना गवळी (Rahul Shewale and Bhavna Gawli) यांच्यासह श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, प्रतापराव जाधव, कृपाल तुमाणे, श्रीरंग बारणे, संजय मंडलिक, धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे आणि राजेंद्र गावीत (Shrikant Shinde, Hemant Patil, Prataprao Jadhav, Kripal Tumane, Srirang Barne, Sanjay Mandalik, Dhairyasheel Mane, Sadashiv Lokhande, Hemant Godse and Rajendra Gavit) यांचा समावेश आहे.यानंतर लोकसभा सचिवालयानं काली रात्री जारी केलेल्या परिपत्रकात शिवसेनेचे लोकसभेतील गटनेता म्हणून राहुल शेवाळे यांचं नाव प्रकाशित करण्यात आलं आहे.

तत्पूर्वी यासंदर्भात काल संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या 12 खासदारांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले;की समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध असून राज्याच्या उत्कर्षासाठी शासनाने लोकहिताचे महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी काल इतर मागास वर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणी संदर्भात विधीज्ञ आणि तज्ज्ञांची भेट घेऊन चर्चा केली.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाला लक्ष्य केले आहे. राऊत म्हणाले, आता जे आमचे 12 प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांच्या बोलत होते ते 2014 साली कुठे होते? भाजपने (BJP) युती तोडली तेव्हा ते कुठे होते? आम्हाला युती तेव्हा हवी होती. आमची शेवटपर्यंत युती होती. पण भाजपने युती तोडली. युतीचा वचननामा तेव्हाही होता. पण तेव्हा युती का तोडली? २०१९ साली सुद्धा भाजपमुळेच युती तुटली. शिवसेना (Shiv Sena) जबाबदार नाही.

संजय राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी आणि ठाकरे कुटुंबात जे संबंध आहेत ते राजकीय नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून संबंध आहेत. त्यांनी मोदींना ताकद आणि पाठिंबा दिला. त्यामुळे दोघांमध्ये सतत बोलणं असायचं. राजकारणात कितीही उलथापालथ झाली तरी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी (Uddhav Thackeray and Narendra Modi) यांच्यातील एक नातं कायम राहिले. जे कुणी गौप्यस्फोट करत आहेत, त्यांना मोदींनी सांगितलं असेल. त्या गोष्टीकडे फारसं लक्ष देवू नका.