#ShivsenaCheatsMumbaikar ट्रेंड ट्विटर ट्रेंडिंगमध्ये!

सत्ता गमावण्याच्या भीतीपोटी सत्ताधारी शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेत वॉर्ड पुनर्रचनेचा खटाटोप सुरू आहे. याचा आता मुंबईकर देखील ट्विटरवर निषेध व्यक्त करत आहे. टॉप पाच मध्ये #ShivsenaCheatsMumbaikar हा हॅशटॅग वापरत ट्विटरवरून याचा विरोध केला जात आहे.

मुंबई महानगरपालिका वॉर्ड रचना संदर्भात मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई भाजप शिष्टमंडळ निवडणूक आयोग आयुक्तांची भेट घेऊन याचा आम्ही निषेध करतो असे निवेदन दिले. आता वॉर्ड रचनेत होणाऱ्या बदला विरोधी युध्दात भाजप पक्षासोबत मुंबईकर देखील उतरले असून या संदर्भात सोशल मीडियावर उद्रेक होत आहे. यावरून आता ट्विटरवर जोरदार चर्चा सुरू आहे, आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू असून #ShivsenaCheatsMumbaikar हा हॅशटॅग वापरून ट्विटरवर ट्विट केले जात आहे. दोन तासात १० हजार पेक्षा जास्त नेटकरांनी ट्विटरवर वॉर्ड पुनर्रचनेच्या विरोधात एकवटले आहेत. शिवसेनेच्या या दडपशाहीला ट्विटरवर मुंबईकरांनी चांगलेच फटकारले.

याची दखल निवडणूक आयोग घेईल का? सत्ताधारी पक्ष शिवसेना सत्तेच्या आकसापोटी जनतेचा विचार न करता प्रभाग रचनेत बदल करेल का? असे अनेक प्रश्न मुंबईकर सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारत आहेत, याचे उत्तर सत्ताधारी पक्ष देऊ शकेल का? मुंबईकरांच्या या युध्दात आता भाजप देखील सहभागी झाला आहे.