मोहित कंबोज यांनी मातोश्री परिसराची रेकी करण्याचा प्रयत्न केला; शिवसेनेचा आरोप

मुंबई – शिवसेना (ShivSena) आणि भाजपमधील (BJP) संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असून मुद्द्यांची लढाई गुद्द्यांवर आल्याचे दिसत आहे. कारण शिवसेनेला शिंगावर घेणारे  भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. मातोश्रीजवळील कलानगर सिग्नलजवळ (Kalanagar signal)  हा हल्ला करण्यात आला आहे.

मातोश्रीबाहेरील रस्त्यावरून मोहित कंबोज यांची गाडी जात होती. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकरत्यांनी त्यांची गाडी ओळखली आणि त्यांच्या कारवर हल्ला केला. यावेळी कंबोज यांचे सुरक्षारक्षक आणि तिथे असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत कंबोज यांची सुरक्षा केली. यावेळी कंबोज यांना पुढे पाठवून देण्यात आले. दरम्यान, कंबोज ‘मातोश्री’ जवळ रेकी करत असल्याचा त्यांच्यावर आरोप  करण्यात येत आहे (mohit-kambojs-car-attacked-near-matoshree).

शिवसेना नेते वरुण सरदेसाई या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मोहित कंबोज चार-पाच गाड्यांसह त्या ठिकाणी आले होते. त्यांनी या परिसराची रेकी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांना उत्तर दिलं आहे. शिवसैनिकांना डिवचू नका.