भाजपचे नवी मुंबईतील माजी नगरसेवक भरत जाधव ( Bharat Jadhav) यांनी पोलिस स्टेशनमध्येच विष पिऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. आपली आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे सांगत भरत जाधव यांनी पोलिसांसमोरच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी नगरसेवक असलेले भरत जाधव ( Bharat Jadhav) हे मागील काही दिवसांपासून आर्थिक संकटात होते. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं सांगत जाधव यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यानंतर ते कर्जत पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथं जाऊन भरत जाधव यांनी विष प्राशन केलं. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. हा प्रकार लक्षात येताच जाधव यांना तातडीने नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडिओत भरत जाधवांनी म्हटले होते की, “मी प्रचंड मानसिक तणावात असल्याने हे पाऊल उचलत आहे. समाजामध्ये वाल्मीक कराड याच्यासारख्या प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मी प्रामाणिकपणे माझा व्यवयाय करत असतानाही मला त्रास देण्यात आला. माझी कामे बंद पाडण्यात आली,” असा आरोप जाधव यांनी केला आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
‘लव्ह जिहाद’ कायद्याला माझा विरोध | Ramdas Athawale
‘फक्त दोन तास ईडी हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील’
सुरेश धस, धनंजय मुंडे भेटीवर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,…