श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) अखेर राहुल मोदींसोबतचे नाते मान्य केले आहे. बऱ्याच दिवसांपासून श्रद्धा कपूर ‘तू झूठी मैं मक्कार’चे लेखक राहुल मोदी यांना डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. आतापर्यंत दोघांपैकी कोणीही याबाबत उघडपणे काहीही बोलले नव्हते, मात्र आता श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर आपले प्रेम व्यक्त केले आहे. श्रद्धाने तिच्या प्रेमाची अखेर कबुली दिली आहे.
श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) इन्स्टाग्रामवर राहुल मोदींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. आपल्या नात्याबद्दल आतापर्यंत मौन बाळगणाऱ्या श्रद्धाने या फोटोसोबत काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या तिने याआधी कधीही लिहिल्या नाहीत. श्रद्धाने इन्स्टाग्रामवर मजेशीर कॅप्शनसह लिहिले आहे- माझे हृदय तुझ्याजवळ ठेव… पण माझी झोप परत दे. यासोबतच तिने राहुल मोदींना हार्ट इमोजी पोस्ट करून टॅगही केले आहे.
अंबानी फॅमिली फंक्शनमध्ये राहुल मोदींसोबत दिसली होती श्रद्धा
श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या डेटींगच्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. अलीकडेच अंबानी फॅमिली फंक्शनमध्ये श्रध्दा कपूरही राहुल मोदींसोबत दिसली होती, पण अभिनेत्रीने याबद्दल कधीही उघडपणे काहीही सांगितले नाही किंवा तिने काही पोस्टही केले नाही. त्ने पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या असे काही पोस्ट केले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :