ग्रीन टीमध्ये गुंगीचे औषध देऊन..! श्रीकांत देशमुखांचा खळबळजनक खुलासा

सोलापूर : हनीट्रॅपमध्ये अडकलेले भारतीय जनता पक्षाचे (BJP) सोलापूर (Solapur) (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (resign) दिला आहे. नुकताच देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरूमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तातडीने देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार श्रीकांत देशमुख यांच्याकडे होता. बेडरुममधील व्हिडिओ आणि तक्रारींनंतर त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुख यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दरम्यान,  राजीनामा देताना देशमुख यांनी आपल्याला राजकीय विरोधकांकडून अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे. त्या महिलेने आपल्याला ग्रीन टीमध्ये गुंगीचे औषध दिले. त्यानंतर माझ्यासोबत आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून चारित्र्यहननाचा प्रयत्न केला. यामध्ये राजकीय विरोधकांच्या सहभागाची दाट शक्यता आहे. या महिलविरोधात आधीच मी ओशिवारा पोलीस ठाण्यात हनीट्रॅप आणि खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचं देशमुख यांनी म्हटले आहे.