Shrikant Shinde | विरोधक औरंगजेबाच्या तत्त्वावर चालत आहेत

Shrikant Shinde | अयोध्यामध्ये राम मंदिर बनविण्यास पाचशे वर्षे लागली. हे मंदिर बनवण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. हे मंदिर फक्त मंदिर नसून ते राष्ट्र मंदिर आहे. या राष्ट्र मंदिरातून आपल्या आणि पुढील पिढीला प्रभू श्रीराम, आपली संस्कृती, हिंदुत्व पुढे घेऊन जाण्यासाठी मदत होणार असल्याचे गौरवोद्गार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी येथे काढले. कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या प्रचार सभेत डॉ. श्रीकांत शिंदे बोलत होते.

कल्याण लोकसभा (Kalyan Loksabha) मतदारसंघात दळणवळणाचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता. गेल्या दहा वर्षांमध्ये रेल्वे, रस्ते, मेट्रो, जलवाहतूक आणि आरोग्य सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली करू शकलो, असे डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. काही लोक ही निवडणूक गल्लीची समजतात. अभद्र भाषा बोलतात. रोज उठल्यानंतर शिव्या शाप देतात. राजकारणाचा स्तर खाली घालवण्याचे काम केल्याची टीका डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर केली.

विरोधक औरंगजेबाच्या तत्त्वावर चालत असल्याचे शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात आहे. देशाला दिशा देण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे नरेंद्र मोदी आणि विकासाचे दुसरे नाव ही नरेंद्र मोदीच आहे. गेल्या दहा वर्षात आपण त्यांच्या कामाचा फक्त ट्रेलर पाहिला, पिक्चर तो अभी बाकी है असे डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप