श्रुती हसनची ही काय झाली अवस्था, आजारपणाबद्दलही दिली माहिती; पाहा Photo

सिनेअभिनेते व अभिनेत्री सातत्याने त्यांच्या फिल्ममुळे चर्चेत असतात. बऱ्याचदा त्यांच्या ग्लॅमरस आणि डॅशिंग लूकमुळेही चाहत्यांचे त्यांच्याकडे लक्ष वेधले जाते. अभिनेते व अभिनेत्री त्यांच्या सोशल मीडियावर अकाउंटवर स्वत:चे सुंदर फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत असतात. मात्र प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री श्रुती हसन (Shruti Haasan) हिने आपले एकदम हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहतेही नक्कीच अस्वस्थ झाले असावेत.

श्रुतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपले असे काही फोटो शेअर केले आहेत, जे सहसा अभिनेत्री शेअर करताना दिसत नाहीत. पहिल्या फोटोत श्रुती केस मोकळे सोडून बसलेली दिसत आहे. तर पुढील फोटोंमध्ये ती थकलेली आणि आजारी असल्याचे दिसत आहे.

हे फोटो शेअर करत श्रुतीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “परफेक्ट सेल्फी आणि पोस्टच्या जगात, असे काहीतरी जे अंतिम टप्प्यात पोहोचले नाही. केसांचा खराब दिवस, ताप आणि सायनसचा दिवस, पीरियड क्रॅम्पचा दिवस आणि बाकीच्या गोष्टी तुम्हालाही आवडतील अशी आशा आहे.”

श्रुतीच्या या फोटोंवर अधिकतर चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. दरम्यान श्रुती पुढील काही दिवसांत प्रभासच्या ‘सालार’ सोबतच बालकृष्णाच्या ‘वीरा सिम्हा रेड्डी’ आणि चिरंजीवीच्या ‘वॉल्टेयर वीरैया’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.