ना सारा तेंडूलकर ना सारा अली खान, क्रिकेटर शुभमन गिलचं हृदय ‘या’ अभिनेत्रीसाठी धडकतं

भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याचे आतापर्यंत बऱ्याच मुलींसोबत नाव जोडले गेले आहे. सुरुवातीला शुभमन सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकर (Sara Tendulkar) हिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल यांच्या नात्याबद्दल अनेक बातम्या समोर आल्या. दोघांना एकत्रही पाहिले गेले. मात्र या दोघांनीही आपल्या नात्यावर आतापर्यंत मौन बाळगले आहे. सारा तेंडूलकरनंतर सारा अली खानसोबतच्या अफेअरच्या बातम्यांदरम्यान, शुभमन गिलने त्याच्या क्रशचे (Shubman Gill Crush) नाव सांगितले आहे.

एका मुलाखतीदरम्यान शुभमन गिलने त्याच्या आवडत्या अभिनेत्रीचे नाव सांगितले आहे. पण यावेळी त्याने जे नाव सांगितले आहे की, ते सारा अली खानचे नसून दुसऱ्याच अभिनेत्रीचे आहे.

एका मुलाखतीदरम्यान शुभमन गिलला विचारण्यात आले की, त्याला कोणती अभिनेत्री सर्वात जास्त आवडते? हा प्रश्न ऐकून शुभमन आधी लाजला आणि नंतर त्याने या प्रश्नाचे उत्तर देणे टाळण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला गेला आणि त्याला त्याच्या आवडत्या अभिनेत्रीचे नाव विचारले गेले, तेव्हा त्याने ‘पुष्पा’ स्टार रश्मिका मंदान्नाचे नाव घेतले. तो म्हणाला की त्याला नॅशनल क्रश म्हणून ओखळल्या जाणाऱ्या रश्मिका मंदान्नावर (Rashmika Mandhana) क्रश आहे.