शुमबन गिलचं शतक आणि शमीचा पंचक; भारताची चॅम्पियन्स ट्रॉफीची विजयाने सुरुवात

शुमबन गिलचं शतक आणि शमीचा पंचक; भारताची चॅम्पियन्स ट्रॉफीची विजयाने सुरुवात

शुभमन गिलच्या शतकाच्या मदतीने भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ( Champions Trophy 2025) पहिल्या सामन्यात बांगलादेशचा सहा विकेट्सने पराभव केला. मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत बांगलादेशला ४९.४ षटकांत २२८ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात, गिलच्या १२९ चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावांच्या खेळीमुळे भारताने ४६.३ षटकांत चार गडी गमावून २३१ धावा करून सामना जिंकला. अशाप्रकारे भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली.

लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा आणि गिलने भारताला चांगली सुरुवात ( Champions Trophy 2025) करून दिली, परंतु रोहित ४१ धावा करून बाद झाला. यानंतर संघाने विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांच्या विकेट गमावल्या. कोहलीने २२ धावा, श्रेयसने १५ आणि अक्षरने आठ धावा केल्या. यानंतर, केएल राहुलने गिलसोबत पाचव्या विकेटसाठी ८७ धावांची नाबाद भागीदारी केली. केएल राहुलने ४७ चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांसह ४१ धावा काढल्या आणि नाबाद राहिला. बांगलादेशकडून रिशाद हुसेनने दोन तर तस्किन अहमद आणि मुस्तफिजूर रहमानने प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पूर्वी, बांगलादेशने तौहीद हृदयॉयच्या शतक आणि झाकीर अलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतासमोर विजयासाठी २२९ धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, बांगलादेशची परिस्थिती एकेकाळी वाईट होती आणि त्यांनी फक्त ३५ धावांमध्ये पाच विकेट गमावल्या होत्या, परंतु झाकीर आणि हरदॉय यांनी एक शानदार भागीदारी करून बांगलादेशचा डाव वाचवला. या दोन डावांच्या मदतीने बांगलादेशला ४९.४ षटकांत २२८ धावा करता आल्या. ११८ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १०० धावा काढल्यानंतर हृदयॉय पॅव्हेलियनमध्ये परतला.

भारताकडून मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. शमीने सामन्यात पाच विकेट्स घेतल्या, तर हर्षित राणाने तीन आणि फिरकीपटू अक्षर पटेलने दोन विकेट्स घेतल्या. या काळात शमीने एकदिवसीय सामन्यांमध्ये २०० बळी पूर्ण केले. बांगलादेशकडून तौहीद व्यतिरिक्त झाकीरने ११४ चेंडूत चार चौकारांसह ६८ धावा केल्या. तौहीद आणि झाकीरला वगळता बांगलादेशच्या इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यांच्या चार फलंदाजांना त्यांचे खातेही उघडता आले नाही, तर तीन खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला नाही. तन्जीद हसनने २५ आणि रिशाद हुसेनने १८ धावांचे योगदान दिले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

ससूनजवळील मोक्याच्या जागेवरून भाजप-शिंदे गट आमनेसामने येण्याची शक्यता

अंजली दमानिया यांचे पुन्हा अर्धवट ज्ञान आणि खोट्या आरोपांचे प्रदर्शन – Dhananjay Munde

मी धक्कापुरुष झालोय! उद्धव ठाकरेंचं मिश्किल वक्तव्य

Previous Post
ससूनजवळील मोक्याच्या जागेवरून भाजप-शिंदे गट आमनेसामने येण्याची शक्यता

ससूनजवळील मोक्याच्या जागेवरून भाजप-शिंदे गट आमनेसामने येण्याची शक्यता

Next Post
घटस्फोटानंतर परदेशी मुलीला डेट करतोय शिखर धवन? भारत-बांगलादेश सामन्यात दिसली मिस्ट्री गर्ल

घटस्फोटानंतर परदेशी मुलीला डेट करतोय शिखर धवन? भारत-बांगलादेश सामन्यात दिसली मिस्ट्री गर्ल

Related Posts
'परफॉर्मन्स' आणि 'टॅलेंट' या दोन वेगवेगळ्या गोष्टी- चंदु बोर्डे

‘परफॉर्मन्स’ आणि ‘टॅलेंट’ या दोन वेगवेगळ्या गोष्टी- चंदु बोर्डे

Chandu Borde : क्रीडा क्षेत्रात आपल्या पाल्याने यावे यासाठी पालक प्रोत्साहन देत आहेत ही गेल्या काही वर्षातील सकारात्मक…
Read More
अल्लू अर्जुन

‘ये भारत का तिरंगा है , कभी झुकेगा नहीं’; अल्लू अर्जुनने जिंकली विदेशातील भारतीयांची मने

न्यूयॉर्क – दक्षिण भारतीय सुपरस्टार अल्लू अर्जुनची(South Indian superstar Allu Arjun)  गणना पूर्वीपासूनच यशस्वी अभिनेत्यांमध्ये केली जात होती,…
Read More
Raju Shetty | रिलायन्स जीओ कंपनीकडून ३०० ते ३५० कोटी जीबी डाटाची फसवणूक, राजू शेट्टींची माहिती

Raju Shetty | रिलायन्स जीओ कंपनीकडून ३०० ते ३५० कोटी जीबी डाटाची फसवणूक, राजू शेट्टींची माहिती

Raju Shetty | देशभरातील १०६ कोटीहून अधिक मोबाईल धारकांना रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया व भारती एअरटेल या कंपन्याकडून…
Read More