मुंबई : अनुष्का मनचंदा ही लोकप्रिय गायिका आहे. अनुष्का ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी अनुष्काने ‘जिया जले’ या गाण्यावर डान्स केल्याचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओत अनुष्का आरश्यात स्वत:चा न्युड व्हिडीओ शूट करताना दिसली आहे. मात्र, काही वेळानंतर तिने हा व्हिडीओ डीलीट केला.
अनुष्का आणि तिचा भाऊ शिखर मनचंदा हे बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या नवजार ईरानी यांचे संगीत लेबल IncInk Recordsचे प्रमुख आहेत. १५ नोव्हेंबर रोजी अनुष्काने ‘दिल से’ या चित्रपटातील लता मंगेशकर यांचं गाणं ‘जिया जले’वरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘थस्ट ट्रॅप’ असे कॅप्शन दिले आहे. मात्र, काही वेळानंतर अनुष्काने हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
अनुष्का ही इंडिपॉप गर्ल ग्रुप विवाची एक मेंबर होती. अनुष्का ही खतरो के खिलाडी २ ची विजेती आहे. एवढंच काय तर अनुष्का ही २०१० मध्ये झलक दिखला जा या शोमध्ये सहभागी झाली होती. अनुष्काला किस नुका या नावानेही ओळखतात.
https://youtu.be/3AmlxDP4tcU