बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे ( Akshay Shinde Encounter) याचा काल अचानक पोलीस चकमकीत मृत्यू झाला. अक्षय शिंदेला दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक केल्यानंतर तळोजा कारागृहातून नेत असताना त्याने कारमधील पोलिसाची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात स्वसंरक्षणादाखल पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या, ज्यात त्याचा मृत्यू झाला.
बदलापूर प्रकरणातील ( Akshay Shinde Encounter) आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र सरकारने या चकमकीच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. डीसीपी ईओडब्ल्यू यांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी या प्रकरणाचा तपास करेल. तळोजा कारागृहातून आरोपींना आणणाऱ्या पथकात पीआय संजय शिंदे, एपीआय नीलेश मोरे आणि दोन कॉन्स्टेबल अशा चार जणांचा समावेश असल्याचे ठाणे पोलिस सूत्रांनी सांगितले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबई आढावा दौरा
नाना पटोलेंना मुख्यमंत्रिपद मिळावं, नाही मिळालं तर ते हिसकावून घेऊ, काँग्रेस नेत्यांचा सूर