ठाण्यातील सहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश; राष्ट्रवादीला खिंडार

ठाण्यातील सहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश; राष्ट्रवादीला खिंडार

मुंबई | ( Eknath Shinde)  कल्याण-डोंबिवली लोकसभा क्षेत्रातील कळवा, खारेगाव, विटावा परिसरातील सहा माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते. नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने पालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना आणखी भक्कम झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार पडले असून कळवा मुंब्रा विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

आज ठाणे मनपाचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनिषा साळवी, माजी नगरसेविका व ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे यांनी भगवा झेंडा हाती घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेनेचा गड आहे. ठाणे महानगरपालिकेतील 78 नगरसेवक शिवसेने सोबत आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना कधी काम करत नाही. शिवसेनेचे काम वर्षाचे बारा महिने ३६५ दिवस सुरु असते याचा अनुभव जनतेने घेतलाय. त्यामुळेच एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडली! भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने 50 ड्रोन्स पाडले

ज्याने पाकिस्तानला सळो की पळो केलं ते एस-400 सिस्टीम नक्की आहे तरी काय?

धरणही उद्ध्वस्त! सर्जिकल स्ट्राइकनंतर भारताची पाकिस्तानला दुसरी जोरदार चपराक

Previous Post
नेते युरोपात, कार्यकर्ते कोमात! एकनाथ शिंदे यांची उबाठावर घणाघाती टीका

नेते युरोपात, कार्यकर्ते कोमात! एकनाथ शिंदे यांची उबाठावर घणाघाती टीका

Next Post
रात्रीच का होतात एअर स्ट्राईक? कारण जाणून थक्क व्हाल!

रात्रीच का होतात एअर स्ट्राईक? कारण जाणून थक्क व्हाल!

Related Posts
अजित पवारांनी धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढलं आणि चिन्ह पण चोरलं - Jitendra Awhad

अजित पवारांनी धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढलं आणि चिन्ह पण चोरलं – Jitendra Awhad

Jitendra Awhad on Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून दोन राष्ट्रवादीतील नेते मंडळी…
Read More

अजित पवारांचा मुलगा किरीट सोमय्यांच्या रडारवर, म्हणाले…

मुंबई : मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात जाऊन फाईल्स पाहिल्यामुळे वादात सापडलेले भाजप नेते किरीट सोमय्या आता ठाकरे सरकारवर…
Read More
राहुल गांधी

भारत जोडो यात्रेतून महाराष्ट्रातील जनतेचे दुःख समजून घेण्यासाठी आलो : राहुल गांधी

नांदेड, देगलूर –  कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेचा उद्देश देश जोडण्याचा आहे. देशात सध्या…
Read More