गुंड अप्पा लोंढेच्या खून प्रकरणात सहा जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

पुणे – पुण्यात उरुळी कांचन (Uruli Kanchan) (ता. हवेली) येथील कुख्यात गुंड अप्पा लोंढे (Appa Londhe) खून प्रकरणातील सहा आरोपींना मकोका न्यायालयाने (Makoka court) दुहेरी जन्मठेप  (double life imprisonment) व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. एन. शिरसीकर (Judge S. N. Shirsikar) यांनी हा आदेश दिला.

अप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू जाधव ( main accused Vishnu Jadhav) याच्यासह सहा जणांना शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने (Shivajinagar District Sessions Court) दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय सबळ पुराव्याअभावी नऊ जणांची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.(Pune Crime news)

लोंढे याचा २८ मे २०१५ मध्ये उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील शिंदवणे रस्ता भागात गोळ्या घालून आणि शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता.आरोपी संतोष मिनराव शिंदे (वय ३४ रा. शिंदवणे, ता. हवेली), निलेश खंडू सोलनकर (वय ३०, रा. डाळींब दत्तवाडी ता. हवेली), राजेंद्र विजय गायकवाड (वय २४ रा. शिंदवणे, ता. हवेली), आकाश सुनील महाडिक (वय २०, रा. उरुळी कांचन, ता. हवेली), विष्णू यशवंत जाधव (वय ३७,रा. माळवाडी, सोरतापवाडी, ता. हवेली) आणि नागेश लखन झाडकर (वय २७, रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली) अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत