Lavaने लॉन्च केला ७ हजारांचा स्मार्टफोन, आताच ऑर्डर केल्यास फ्रीमध्ये मिळणार ‘ही’ वस्तू

बजेट स्मार्टफोन बाजारात तेजीत आहेत. असे अनेक स्मार्टफोन्स आहेत, ज्यांची किंमत ७ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, पण फीचर्स जबरदस्त आहेत. नुकताच LAVA ने भारतात 7,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो दमदार फिचर्सने भरलेला आहे. Lava X3 असे या फोनचे नाव आहे. या फोनची थेट स्पर्धा Redmi A1+, Realme C33 सारख्या फोनशी असेल. चला जाणून घेऊया Lava X3 ची किंमत आणि फीचर्स…

Lava x3ची भारतातील किंमत 
भारतात Lava X3 ची किंमत फक्त 6,999 रुपये आहे. हा फोन तीन रंगांमध्ये (आर्क्टिक ब्लू, चारकोल ब्लॅक आणि लस्टर ब्लू) येतो. जर खरेदीदाराने 20 डिसेंबर रोजी फोनची प्री-ऑर्डर केली, तर त्याला रुपये 2,999 किमतीचा Lava ProBuds N11 नेकबँड पूर्णपणे मोफत मिळेल.

Lava X3 चे फिचर्स
Lava X3 ला 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळतो, ज्याला HD+ रिझोल्यूशन मिळेल. फोनच्या शीर्षस्थानी वॉटरड्रॉप नॉच आणि तळाशी जाड बेझल्स आढळतील. ड्युअल कॅमेरा सेटअप आणि मध्यभागी फिंगरप्रिंट स्कॅनरसह, गोळीच्या आकाराचे कॅमेरा मॉड्यूल मागे आढळेल. फोनमध्ये Helio A22 प्रोसेसर असेल. फोनमध्ये 3GB रॅम + 32GB स्टोरेज मिळेल.

Lava x3 कॅमेरा
Lava X3 ला 8MP प्राथमिक कॅमेरा आणि मागच्या बाजूला आणखी एक VGA लेन्स मिळेल. त्यासोबत एलईडी फ्लॅश उपलब्ध असेल. समोर 5MP सेल्फी शूटर उपलब्ध असेल. फोनमध्ये ब्यूटी आणि अनेक मोड उपलब्ध असतील.

Lava x3 बॅटरी
Lava X3 ला 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4000mAh ची मजबूत बॅटरी मिळेल. फोन Android 12 Go out of the box वर चालेल. याशिवाय फोनमध्ये 4G VoLTE, USB-C पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, ब्लूटूथ, वायफाय आणि GPS यांचा समावेश आहे.