Smriti Mandhana | स्मृती मानधनाचे वनडेत सलग दुसरे शतक, मोठ्या विक्रमात मिताली राजची बरोबरी

भारतीय महिला संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले आहे. मंधानाने बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 103 चेंडूत तिचे सलग दुसरे शतक पूर्ण केले. याच मैदानावर 16 जून रोजी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मंधानाने 117 धावांची स्फोटक खेळी केली होती. मंधानाचे हे वनडे क्रिकेटमधले 7 वे शतक आहे आणि देशातील तिचे दुसरे शतक आहे. मंधानाच्या या दमदार फलंदाजीमुळे टीम इंडियाने पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा 145 धावांनी पराभव केला.

भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियासाठी शेफाली वर्मा मंधानासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी आली होती. मात्र, शेफाली केवळ 20 धावा खेळून बाद झाली. यानंतर दयालन हेमलता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली. हेमलताला 41 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह केवळ 24 धावा करता आल्या.

पहिले दोन विकेट पडल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर स्वतः चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आली. सुरुवातीला काही चेंडू काळजीपूर्वक खेळल्यानंतर हरमनप्रीतने हात उघडला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज चक्रावून गेले. मंधानाचे  (Smriti Mandhana) शतक पूर्ण करण्यासोबतच हरमनप्रीत कौरनेही आपले अर्धशतक पूर्ण केले.

यानंतर मानधनाने तिचं शतक पूर्ण करताच. हरमनप्रीतने अर्धशतक केले. अशाप्रकारे मंधाना आणि हरमनप्रीतच्या जोडीने संघाची धावसंख्या 200 धावांच्या पुढे नेली. या मालिकेतील पहिल्या वनडेत फलंदाजीत हरमनप्रीतला काही खास दाखवता आले नाही. तिच्या बॅटमधून फक्त 10 धावा आल्या. अशा स्थितीत या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर भारतीय कर्णधाराने सुटकेचा नि:श्वास सोडला असता.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like