स्मृती मानधना बनली ‘सेंच्युरी क्वीन’, मोडला सर्वाधिक शतकांचा भारतीय विक्रम

स्मृती मानधना बनली 'सेंच्युरी क्वीन', मोडला सर्वाधिक शतकांचा भारतीय विक्रम

स्मृती मानधना (Smriti Mandhana Century Queen) हिने एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ती आता भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावणारी क्रिकेटपटू बनली आहे. महान फलंदाज मिताली राजला मागे टाकत तिने हा विक्रम केला आहे. स्मृतीने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 100 धावांची खेळी केली आणि टीम इंडियाला मालिका 2-1 ने जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

स्मृती मानधनाचे वनडे कारकिर्दीतील (Smriti Mandhana Century Queen) हे आठवे शतक होते. सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत आता केवळ 6 खेळाडू तिच्या पुढे आहेत. स्मृतीपूर्वी हा विक्रम भारतीय मिताली राजच्या नावावर होता, जिने आपल्या 232 सामन्यांच्या प्रचंड कारकिर्दीत एकूण सात शतके झळकावली होती. महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडू मेग लॅनिंगच्या नावावर आहे, जिने आपल्या शानदार कारकिर्दीत 15 शतके झळकावली. लॅनिंग 2023 मध्ये निवृत्त झाली.

स्मृती मानधनाचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 10 वे शतक होते कारण तिने 7 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत दोन शतकी खेळी खेळली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाने आतापर्यंत 88 सामन्यांमध्ये 3,690 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तिच्या नावावर 8 शतके आणि 27 अर्धशतके आहेत.

स्मृती मानधना यांचे इतर रेकॉर्ड
स्मृती मानधना याआधी भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2,000 धावा करणारी खेळाडू ठरली आहे. तिने हा विक्रम 51 डावात केला असून सर्वात जलद 3000 धावा करण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे. मानधानाने 76 डावांमध्ये तीन हजार धावांचा आकडा गाठला होता. ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8,000 धावा करण्यापासून केवळ 113 धावा दूर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटपटू मिताली राज आहे, जिने तिच्या कारकिर्दीत तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 10,868 धावा केल्या आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

“कोथरूडकरांचे आरोग्यदूत: चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आरोग्य सेवा मजबूत” | Chandrakant Patil

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली, ‘या’ जागांवर मविआत मैत्रीपूर्ण लढत

रिपब्लिकन पक्ष महायुतीचा प्रचार करणार, पुण्यातील पदाधिकाऱ्यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती

Previous Post
महाराष्ट्रात कोणते नेते काँग्रेसचा प्रचार करणार? राहुल गांधी-सचिन पायलटसोबत ही नावं यादीत

महाराष्ट्रात कोणते नेते काँग्रेसचा प्रचार करणार? राहुल गांधी-सचिन पायलटसोबत ही नावं यादीत

Next Post
भोसरीतील विरोधकांची अवस्था म्हणजे 'दिवा विझतानाची फडफड'!

भोसरीतील विरोधकांची अवस्था म्हणजे ‘दिवा विझतानाची फडफड’!

Related Posts
काका -पुतण्यांच्या संघर्षाचा इतिहास नवा नाही; यापूर्वी हे नेते मंडळी आले होते आमने-सामने

काका -पुतण्यांच्या संघर्षाचा इतिहास नवा नाही; यापूर्वी हे नेते मंडळी आले होते आमने-सामने

राज्याच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी भूकंप घडवून आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेल्या फुटीनंतर अजित पवार…
Read More
अजित पवार

लोक टीका करतात पण कारखाना चालवायला कुणीही पुढे येत नाही – अजित पवार 

मुंबई  – राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये झालेला गैरव्यवहाराचा मुद्दा अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे तो अगोदरही…
Read More
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी

सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी

Shah Rukh Khan | सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सलमाननंतर आता बातम्या…
Read More