…तर आज उत्पल आमदार असता – देवेंद्र फडणवीस

पणजी : गोव्यात भाजपा पुन्हा एकदा सत्तेच्या वाटेवर आहे, कारण मतमोजीणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत समोर आलेल्या निकालांवरून भाजपा सर्वात मोठा पक्ष दिसत आहे. भाजपाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील विजयी झाले असून, भाजपाकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आजच राज्यपालांची भेट घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

गोव्यात सर्वात जास्त चर्चेत असणारी जागा म्हणजे पणजी विधानसभा मतरदार संघाची होती. याठिकाणी भाजपने दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांनी तिकीट नाकारले होते. उत्पल पर्रीकर यांनी तिकीट नाकारल्यानंतर बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र पणजीकर जनतेने पर्रीकर यांना नाकारलेल दिसत आहे. कारण पणजी मधून भाजपचे बाबूश मोन्सेरात यांचा विजय झाला आहे. पर्रीकर यांच्या ८०० मतांनी पराभव झाला असून हा पर्रीकर याना मोठा धक्का मनाला जात आहे.

उत्पल पर्रिकर यांच्या पराभवावर भाजप येते आणि गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पणजी मधून बाबूश मोन्सेरात विजयी झाले याचा मला अतिशय आनंद आहे पण उत्पलच्या पराभवाचा आनंद मी करूच शकत नाही कारण तो आमच्या परिवारातील एक सदस्य आहे. तेव्हा जर उत्पलने योग्य निर्णय घेतला असता तर आज तो असता’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.