पुण्यात लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर Mayuri Pawar बेपत्ता; घरात सापडली सुसाईड नोट

Mayuri Pawar : पुण्यात सातत्याने हिट अँड रनची प्रकरणे घडत असताना पुण्यातील सोशल मीडिया इन्ल्फूएन्सर मयुरी पवार (Mayuri Pawar) ही अचानक घर सोडून निघून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मयुरी १५ जूनपासून बेपत्ता झाली आहे. ती घरात सुसाईड नोट लिहून ठेवत कोणाला काहीही न सांगता निघून गेली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

मयुरी अचानक बेपत्ता होण्यामागचे करण अद्याप समजू शकले नाही. परंतु तिच्या बेपत्ता होण्यामुळे कुटुंबीय चिंतेत आहेत. मयुरी १५ जून रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास घरात कोणी नसताना कोणाला काही एक न सांगता निघून गेली. ती अद्याप घरी परत आलेली नाही. याप्रकरणी मंगल दिलीप पवार (वय-४०) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष मोरे करीत आहेत.

२६ वर्षीय मयूरी चैतन्य मोडक-पवार ही सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असून इन्स्टाग्रामवर तिचे १.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर माऊ नावाने तिचे अकाउंट आहे. तिने ‘दुर्गा ग्रुप’ नावाने संस्था सुरु केली असून याच्या माध्यमातून ती कपड्यांचा व्यवसाय करत होती.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like