रस्त्याचे प्रश्न प्राधान्याने सोडणार, आणखी काही कामे असतील तर सांगा – शंकरराव गडाख

सोनई : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, नागरिकांना दळणवळणासाठी रस्ते प्रमुख माध्यम आहेत. त्यामुळे माका, पाचुंदासह नेवासे तालुक्यात विविध गावांत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. रस्त्याच्या विकासातूनच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. या परिसरातील आणखी काही कामे असतील, तर सांगा, ती प्राधान्याने केली जातील, असे प्रदिपादन राज्याचे मृद जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

नेवासे तालुक्यातील माका ते पाचुंदा रस्त्याच्या २ कोटी १० लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मंत्री गडाख यांच्या हस्ते माका येथे करण्यात आला. त्याप्रसंगी गडाख बोलत होते. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात झालेल्या भीषण दुर्घटनेत माका, पाचुंदा, तेलकुडगाव येथील तीघांचा दुदैवी मृत्यू झाला होता. मंत्री गडाखांनी विशेष प्रयत्न करत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी चार लाखांची मदत उपलब्ध केली होती. त्या निधीच्या धनादेश वाटप गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुळा कारखान्याचे संचालक लक्ष्मणराव पांढरे, एकनाथ जगताप, सरपंच नाथाजी घुले, ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ म्हस्के, सुदाम घुले, रमेश कराळे, देविदास भुजबळ, साहेबराव होंडे, माणिक होंडे, एकनाथ भुजबळ, सुभाष गाडे, भरत होंडे, अमित रासने, सुखदेव होंडे, भानुदास म्हस्के यादव शिंदे, नारायण माने, बबन भानगुडे, अण्णासाहेब केदार, विधिज्ञ गोकुळ भताने, जनार्दन घुले, सलिम शेख, रावसाहेब गायके, राजू पालवे आदी उपस्थित होते.

हे देखील पहा