काही लोक काळ्या जादूचा अवलंब करतायत; नरेंद्र मोदी यांची कॉंग्रेसवर टीका 

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेसला (Congress) लक्ष्य केले आहे. राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या वतीने ५ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसकडून पंतप्रधान निवास आणि राष्ट्रपती भवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या (Unemployment) विरोधात काँग्रेसने आंदोलन केलं होतं. आता यावर पंतप्रधान मोदींनी पाच दिवसांनी निशाणा साधला.

काळ्या जादुचा उल्लेख करत टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून म्हटलं की, काही लोक काळ्या जादूचा अवलंब करतातय. ते निराशा आणि नकारात्मकतेत बुडलेले असतात. काळ्या जादूचा प्रचार करण्याचा प्रयत्न झाल्याचे आपण सर्वांनी 5 ऑगस्ट रोजी पाहिलं. या लोकांना वाटते की काळे कपडे परिधान केल्याने त्यांचा निराशेचा काळ संपेल, असही मोदींनी म्हटलं.

दरम्यान या लोकांना ठावूक नाही की, त्यांनी कितीही काळी जादू केली आणि अंधश्रद्धांवर विश्वास ठेवला, तरी भारतातील जनता त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाहीत, असंही मोदींनी म्हटलं आहे. आता मोदींच्या या टीकेला कॉंग्रेस कसे उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.