Aryan Mishra | प्रत्येक मुला-मुलीचे स्वप्न असते की त्यांच्या पालकांना अभिमान वाटावा आणि मग तो मुलगा असो वा मुलगी, यासाठी ते काहीही करायला तयार असतात. ज्या इमारतीत बॉलिवूड स्टार सुनील शेट्टीचे वडील काम करायचे, पुढे जाऊन सुनील शेट्टीने ती संपूर्ण इमारत विकत घेतली.
अशीच आणखी एक घटना आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. जिथे एका मुलाने आपल्या वडिलांसाठी असे कृत्य केले आहे. हे जाणून घेतल्याने तुम्हालाही खूप आनंद होईल. या मुलाने त्याच्या वडिलांसाठी त्या आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था केली. ज्या हॉटेलमध्ये त्याचे वडील एकेकाळी चौकीदार म्हणून काम करायचे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वडील ज्या हॉटेलमध्ये चौकीदार होते त्याच हॉटेलमध्ये मुलाने जेवणाची व्यवस्था केली.
दिल्लीतील रहिवासी आर्यन मिश्राने (Aryan Mishra) आपल्या वडिलांना अशी भावनिक भेट दिली आहे. सध्या सोशल मीडियावर याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. खरंतर आर्यन मिश्रा त्याच्या पालकांना दिल्लीतील आयटीसी हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला होता. पण हे सामान्य जेवण किंवा सामान्य हॉटेल नव्हते. आर्यन मिश्रा त्याच्या पालकांना दिल्लीतील आयटीसी हॉटेलमध्ये जेवायला २५ वर्षांनी घेऊन गेला होता. त्याचे वडील १९९५ ते २००० पर्यंत त्याच हॉटेलमध्ये चौकीदार म्हणून काम करत होते. त्याने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या डिनरचा फोटो आणि कहाणी देखील शेअर केली. जे आता व्हायरल होत आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
महाराष्ट्रात सातत्याने भ्रष्टाचार होतोय मग त्याची चौकशी का होत नाही? – Supriya Sule