‘भारताल्या बऱ्याचशा मुली आळशी, म्हणून त्यांना पैसेवाला नवरा हवा’, सोनाली कुलकर्णीच्या वक्तव्याची चर्चा

बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी अनेकदा वादग्रस्त विधाने करून चर्चेत येतात आणि त्यामुळे लोक त्यांचा विरोध करू लागतात. याच साखळीत बॉलिवूड अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचाही समावेश झाला आहे. सोनाली कुलकर्णीही तिच्या बिनधास्त आणि निर्भीड स्वभावासाठी खूप प्रसिद्ध आहे. सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) अनेकदा प्रत्येक मुद्द्यावर आपली बाजू सर्वांसमोर मांडताना दिसते. दरम्यान, सोनाली कुलकर्णीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती मुलींबद्दल बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये सोनाली कुलकर्णीने काय म्हटले आहे की लोक तिच्यावर जोरदार टीका करत आहेत?

मुलींना आपला होणारा पती फार पैसेवाला हवा आहे. त्याला चांगला जॉब हवा आहे. त्याचे स्वताचे घर हवे आहे, त्याच्याकडे सगळ्या सोयीसुविधा हव्या आहेत. मात्र ते एकत्रितपणे काम करण्यास नकार देतात. वेगळ्या प्रकारच्या अपेक्षा वाढताना दिसत आहेत. कित्येक कुटूबांनी मुलींना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. याचा अर्थ हाच की त्यांनी त्यांच्या जबाबदारीनं जगावं.

भारतातल्या बऱ्याचशा मुली या आळशी आहेत. त्यामुळेच की काय त्यांच्या बहुतांशी अपेक्षा या सगळ्या नवऱ्याकडून आहेत. त्याचे स्वताचे घर, चांगला जॉब, मोठा पगार, दरवर्षी त्याच्या पगारात होणारी वाढ अशा वेगवेगळ्या त्यांच्या अपेक्षा आहेत, मात्र यासगळ्याचा नात्यावर काय परिणाम होतो हे कुणी सांगायला तयार नाही. त्यावर विचारही होत नाही. त्यांना आपण संसारासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे हे लक्षात का येत नाही. असा प्रश्न सोनालीनं यावेळी उपस्थित केला.

मी सगळ्यांना सांगू इच्छिते की, येत्या काळात तुम्ही अधिक स्वावलंबी व्हावं. तुमच्या पार्टनर सोबत खर्च देखील शेयर करावा. केवळ कुणावर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही. असं मत सोनालीनं यावेळी व्यक्त केले आहे. तिच्या या भूमिकेचे कौतूक होत आहे तर काहींनी त्यावर प्रतिकूल प्रतिक्रियाही दिल्या आहेत.