Sony Marathi Serial | ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ मालिकेत गौरव घाटणेकर प्रमुख भूमिकेत, १० जूनपासून होणार प्रदर्शित

Sony Marathi Serial | निरनिराळे विषय आणि रंजक मालिका घेऊन सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. त्यांतील आगळेवेगळे विषय प्रेक्षकांना नेहमीच आवडतात. मालिकेतील काही व्यक्तिरेखा कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. अशीच एक नवी मालिका सोनी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे. ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा असे या मालिकेचे नाव असून ही मालिका प्रेक्षकांना १० जूनपासून सोनी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे. मालिकेचा विषय फार नवीन आणि वेगळा आहे. आपल्या शेतकरी वडिलांना ही भूमिकन्या कशी साथ देणार, हे या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ मालिकेची झलक प्रेक्षकांना विशेष आवडली आणि त्यामुळे या मालिकेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळते आहे. मालिकेचे प्रमुख आकर्षण म्हणजे या मालिकेतून गौरव घाटणेकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचा लाडका अभिनेता गौरव घाटणेकर या मालिकेत प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हर्षवर्धन असे त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव असून गौरव या मालिकेत चक्क दुहेरी भूमिका साकारणार आहे. ती म्हणजे तो या मालिकेचा निर्मातासुद्धा आहे. श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांच्या ब्लॅक कॉफी प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेमार्फत या मालिकेची निर्मिती केली जात असून १० जूनपासून ही मालिका प्रेक्षकांच्या ( Sony Marathi Serial) भेटीस येणार आहे.

आता हर्षवर्धनची व्यक्तिरेखा कशी असेल आणि त्याचा परिवेष कसा असेल याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. पण ही व्यक्तिरेखा लवकरच सोनी मराठी वाहिनीवर पाहता येईल. मालिकेचा विषय फार नवीन आणि वेगळा आहे. आपल्या शेतकरी वडिलांना ही भूमिकन्या कशी साथ देणार, हे या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. लक्ष्मी असे या भूमिकन्येचे नाव असून अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे हिला प्रेक्षकांनी आजवर विविध व्यक्तिरेखांमधून पाहिले आहे. प्रेक्षकांनी तिच्यावर भरभरून प्रेमदेखील केलं आहे. पण आता ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ या मालिकेत भूमिकन्या म्हणजेच लक्ष्मी या व्यक्तिरेखेद्वारे ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आता हर्षवर्धन आणि लक्ष्मी यांची जोडी कशा प्रकारे प्रेक्षकांच्या भेटीस येईल, हे प्रेक्षकांना प्रत्यक्ष मालिकेतूनच पाहायला मिळेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप