‘सौंदर्यवती PSI’ पल्लवी जाधव अडकल्या विवाहबंधनात; सोशल मिडीयावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

जालना – दबंग महिला अधिकारी अशी ओळख असणाऱ्या पीएसआय पल्लवी जाधव (PSI Pallavi Jadhav) विवाहबंधनात अडकल्या आहेत. पल्लवी आणि कुलदीप यांचा विवाहसोहळा रविवारी (15 मे) थाटामाटात पार पडला (Pallavi and Kuldeep got married on 15th may). पल्लवी जाधव यांनी अनेक सौंदर्यस्पर्धा जिंकल्या (pallavi has won many beauty contests) आहेत आणि मुलींनी आत्मविश्वासाने जगावं यासाठी त्या सातत्याने प्रोत्साहन देत असतात.

PSI पल्लवी जाधव यांनी आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच त्यांना नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळत असल्याचं दिसून येतं. लवकरच पल्लवी ‘हैदराबाद कस्टडी’ (Hyderabad Custody) या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. या चित्रपटात पल्लवी मुख्य भूमिकेत असून अभिनेता मंगेश देसाई आणि अभिनेत्री तेजा देवकर देखील चित्रपटात झळकणार आहेत.

पल्लवी जाधव या मूळच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावच्या आहेत. कौटुंबिक परिस्थिती अतिशय हलाखीची असताना त्यांनी पोलिसात दाखल होण्याचं स्वप्न पाहिलं. सध्या त्या जालन्यातील महिला सुरक्षेसाठी नेमलेल्या दामिनी पथकाचं त्या नेतृत्व करतात.