द. भारतात फिरायला जाण्याचा प्लान आहे? मग ‘या’ पर्यटनस्थळांना अवश्य भेट द्या

south india tourism

मुंबई : गर्द हिरवेगार बॅकवॉटर्स, सुंदर समुद्रकिनारे आणि वास्तुशास्त्रीय चमत्कारांनी दक्षिण भारताला भारतीय पर्यटन उद्योगात अग्रणी बनवले आहे. निसर्गाचे विलोभनीय नजारे पाहण्यासाठी अनेक पर्यटक दक्षिण भारतात अगदी दरवर्षी जात असतात. या लेखाच्या माध्यामतून आपण दक्षिण भारतातील काही पर्यटन स्थळांच्या बाबतीत जाणून घेणार आहोत.

बहुतांश दक्षिण भारतीय मंदिरांमध्ये द्रविडी स्थापत्यकला प्रामुख्याने आढळून येते. हम्पी, तंजावर आणि मामल्लापूरम येथे बरीच ऐतिहासिक हिंदू मंदिरे वसलेली आहेत. या प्रदेशातील तिरुपती हे सर्वात गजबजलेले तीर्थस्थान आहे. कोचीमधील ज्यू धर्मियांचे सिनगॉग, हैद्राबादमधील मक्का मस्जिद आणि कर्नाटकमधील नामड्रोलिंग निंगमापा तिबेटी मठ ही ठिकाणे सुद्धा आपल्या ऐतिहासिक महत्त्वाकरिता प्रसिद्ध आहेत.

दक्षिण भारत प्राणी व वनस्पतींच्या विविध प्रजातींनी नटलेल्या विशाल उष्णकटिबंधीय जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतातील जंगलांमध्ये अजूनही हत्ती व वाघांची संख्या भारतामध्ये सर्वांत जास्त आहे. जर आपल्याला वन्यजीव निरीक्षण आवडत असेल तर बांदीपूर, मुदुमलाई आणि पेरियार राष्ट्रीय उद्यानला भेट द्या. कोवलम, मंगळुरू आणि गोकर्ण येथे भारतातील काही सर्वात सुंदर समुद्रकिनारे आहेत.

मुनार हे केरळमधल्या इडुकी जिल्ह्यातील अति उंचावरचं गाव आहे. केरळच्या पश्चिम घाटावरच्या घनदाट या एकाच शब्दात वर्णन करता येईल अशा हिरव्या कोंदणात मुन्नार चपखलपणे वसलेले आहे. हिरव्याहिरव्या गार गालिच्यांच्या मुन्नारला दक्षिणेकडचे काश्मीर अशी पदवी मिळालेली आहे. मानवनिर्मित अजब पण कृत्रिम पर्यटन स्थळांच्या तुलनेत हिरव्या रंगाची उन्मुक्त उधळण असलेले मुन्नार निश्चितच उजवे आहे.

तेलंगणातील वानपर्ती जवळील श्रीरंगापूर येथे श्री रंगनाथस्वामी मंदिर आहे. जे 18 व्या शतकात राम कृष्णादेव रायाने राम पुष्पा करणी तलावाजवळ बांधले होते. हे मंदिर बर्‍याच कलाकृतींनी समृद्ध आहे, पर्यटकांना मंदिरातील अनेक सुंदर कला कृती पाहण्यास मिळतात.

फरहाबादचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आवडणारे असून ते पूर्व घाटाच्या नल्लामाला टेकड्यांच्या हिरवळाने वेढलेले आहे. बरेच लोक हे माउंट प्लेझंट म्हणून देखील ओळखले जातात. येथील जंगलामध्ये तुम्हाला ट्रेकिंगचा आंनद घेवू शकतात. तसेच टायगर वाइल्ड्स जंगल कॅम्पमध्ये रोमांचक सहलिचा आनंद घेऊ शकता.

देवीकुलम मुन्नारपासून आठ किलोमिटर अंतरावर मनोहारी पर्यटनस्थळ आहे. दक्षिण भारतातील हे सुंदर हिल स्टेशन पर्यटकांना वर्षानुवर्षांपासून आपल्याकडं खुणावतेय. येथे मंगलम देवी मंदिर, एराविकुलम नॅशनल पार्क, चिनार वाईल्डलाईफ सेन्च्युरू आणि कुरिब्जीमाला सैन्चुरी सारखी अनेक ठिकाणं भेट देण्यासारखी आहेत.

Previous Post
aashish shelar

राज्यात ‘तक्रारदार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त’, अशी स्थिती निर्माण झाली आहे – शेलार

Next Post
mobile

मोबाईलची बॅटरी लवकर संपतेय? ‘हे’ उपाय करून पाहा

Related Posts

‘कोणतीही बाई आली तर त्यावेळी सगळे उभे राहून बाईकडे बघायचो’

पटना – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी एका कार्यक्रमात असे वक्तव्य केले, ज्याची बरीच चर्चा होत आहे.…
Read More
jayant patil and ajit pawar

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या ७ आमदारांची दांडी

Mumbai – महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. (Rahul Narvekar finally becomes the Speaker…
Read More
सार्वजनिक गणेश मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन | Pune Ganesh festival

सार्वजनिक गणेश मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन | Pune Ganesh festival

बारामती | सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी (Pune Ganesh festival) सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच मंडळांनी उत्सवातील…
Read More