नांदेड : महाविकास आघाडी सरकारने मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडउन ठेवला असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यावर प्रतिउत्तर देताना मंत्री अशोक चव्हाण यांनी पाटील यांच हे बोलणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे म्हटलं आहे.
सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्या नंतर मंत्री चव्हाण यांनी नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेत सरकारच्या कामाची माहिती दिली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला मंत्री अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले आहे.
दरम्यान, भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीवर टीका करताना हे सरकार पुत्र, पुत्री आणि पुतण्याचे लाड पुरवणारे सरकार असल्याची टीका केली. त्यावर कोण कुणाचा पुत्र, कुणाची पुत्री यात मला पडायचं नाही. मला राजकीय स्टेटमेंट पेक्षा विकासाच्या मुद्यावर बोलणं योग्य वाटतं अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी नांदेड मध्ये दिली आहे.
https://youtu.be/FkhUTw1OjTM