पुष्कर तुळजापूरकर- नेता सर्वसामान्यांचा

पुणे –  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शिशु स्वयंसेवक ते पुणे शहर भारतीय जनता पार्टी प्रचार व प्रसिद्धी प्रमुख असा प्रवास करणाऱ्या पुष्कर तुळजापूरकर यांच्याबाबत  नेता सर्वसामान्यांचा या सदरामध्ये आज जाणून घेणार आहोत. या लेखाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा आढावा आपण घेणार आहोत.

तुळजापूरकर  यांनी नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट च्या माध्यमातून दरवर्षी १००गरजू कुटुंबांना शिधा वाटप ,अपंगांना सायकली ,गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती रक्तदान शिबिरे ,आरोग्य तपासणी शिबिरे अशी अनेक समजुपयोगी कार्ये त्यांनी यशस्वी पणे केली आहेत. याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी ने त्यांना प्रथम युवा वॉर्ड अध्यक्ष ,युवा मोर्चा विधानसभा उपाध्यक्ष, मतदार संघ सांस्कृतिक आघाडी उपाध्यक्ष अशी पदे दिली  त्या माध्यमातून त्यांनी जनते ची सेवा आजवर केली.

त्यांच्या कामाची व संपर्क यंत्रणा पाहून रत्नपारखी म्हणून ओळख असलेले पुण्याचे खासदार व तत्कालिन कसबा मतदारसंघाचे आमदार पालक मंत्री गिरीश बापट यांनी त्यांना कसबा मतदार संघाचा सहप्रचार व प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी दिली. पक्षाच्या प्रत्येक कार्यात ते अतिशय उत्साहाने सहभागी होत ह्याच कामाची पोहोच पावती म्हणून की काय त्यांना तीन वेळा प्रचार प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली.

पुढे करोना काळात जेव्हा इतर पक्षाचे लोक घरी बसले तेव्हा हा कार्यकर्ता त्याच्या सवंगड्यांना घेऊन रस्त्यावर करोनाशी दोन हात करायला उतरला. करोना काळातील काम मग त्यात रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देण्यापासून ते करोना रुग्ण अंत्यसंस्कार पर्यंत त्याने वेळ काळ न पाहता लोकांच्या मदती साठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. दिल्ली मध्ये अत्यवस्थ असलेल्या एका रुग्णाअसाठी तर त्याने राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पर्यंत पाठपुरावा करून त्या रुग्णाचे पुण्यात बसून प्राण वाचवले याची दखल स्थानिक वृत्तपत्र व वाहिनी यांनी घेतली.

असे म्हणतात की तुम्ही जेव्हा निस्वार्थी पणे काम करता चांगले काम करत असता त्याची दखल समाज घेत असतो त्याचीच पावती म्हणून भारतीय जनता पार्टीचे शहरअध्यक्ष जगदिश मुळीक यांनी त्यांची निवड पुणे शहर प्रचार प्रसिद्धी प्रमुख म्हणून केली पुष्कर तुळजापूरकर यांनी आजवर कोणत्याही पदाची किंवा इतर अपेक्षा न करता लोकांसाठी अविरत कार्य केले असा हा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून स्वतःची ओळख करून देणारा नेताच होय…..