Underworld : अंडरवर्ल्डची माफिया क्वीन जिच्यापुढे दाऊद इब्राहिम-हाजी मस्तान सारख्या खुंखार डॉननेही डोके टेकवले 

Mumbai – एक काळ असा होता की मुंबईत माफिया राजवट शिगेला पोहोचली होती . करीम लाला, हाजी मस्तान , दाऊद, वरदराजन वर्धा अशी अनेक नावे चर्चेत राहिली. पण एक माफिया क्वीन (Mafia Queen) होती, जिच्यासमोर या सर्व डॉन माथा टेकवत. मुंबईच्या या माफिया राणीचे नाव जेनाबाई दारुवाली. (Jenabai Daruvali)

जेनाबाईंचा जन्म 1920 मध्ये मुंबईतील डोंगरी येथे झाला. जेनाबाईंचे खरे नाव झैनाब होते आणि तिचे वडील माल वाहतूक आणि प्रवासी नेण्याचे काम करायचे. कुटुंब मोठे होते आणि 6 भावांमध्ये ती एकुलती एक बहीण होती. जेनाबाईचा विवाह वयाच्या १४ व्या वर्षी झाला. यानंतर तिला पाच मुलं झाली, पण फाळणी झाल्यानंतर जेनाबाईचे जगच बदलून गेले. जेनाबाईने मुंबई सोडण्यास नकार दिल्याने तिचा नवरा त्यांना 5 मुलांसह सोडून पाकिस्तानात गेला.अशा परिस्थितीत जेनाबाईंनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तांदूळ विकण्याचे काम सुरू केले आणि काही दिवसांतच या कामाचे रुपांतर रेशनच्या तस्करीत झाले.मात्र, काही दिवसांनी हा व्यवसाय बंद झाला आणि त्यानंतर जेनाबाईंनी दारू बनवून विक्रीचे काम सुरू केले.(special article on Jenabai Daruvali)

हळूहळू ती माफिया आणि तस्करांच्या संपर्कात आली. आणि अशा पद्धतीने ती जेनाबाई ची जेनाबाई दारूवली  झाली. 70 च्या दशकापर्यंत तिला माफिया क्वीन म्हटले जाऊ लागले आणि सर्व व्यवसाय तिच्या इशाऱ्यावर सुरू झाले. दाऊद जेनाबाईला  फक्त २० वर्षांचा असताना भेटला. एक काळ असा होता जेव्हा करीम लाला , हाजी मस्तान आणि वरदराजनसारखे (Karim Lala, Haji Mastan and Varadarajan) माफिया तिच्या सल्ल्याने काम करू लागले आणि ते सर्व जेनाबाईला मौसी किंवा आपा या नावाने हाक मारायचे. पण जसजसे वय वाढत गेले तसतशी प्रतिष्ठाही कमी होत गेली आणि मुंबई बॉम्बस्फोटानंतर काही वर्षांनी जेनाबाईचा मृत्यू झाला.

आयुष्याच्या शेवटच्या वर्षांत जेनाबाईने सर्वस्व सोडून धर्माचा मार्ग निवडला होता.असं म्हणतात की 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर (1993 Bomb Blast) जेनाबाई खूप अस्वस्थ होऊ लागल्या. तिचे नेटवर्क असेच राहिले असते तर स्फोटाची माहिती तिला अगोदरच कळली असती आणि ती रोखू शकली असती याचीही तिला खंत वाटायची. तिचा दाऊदवरही राग होता. मुंबईतील बॉम्बस्फोटांनी तिला हादरवून सोडले. पुढे आजार वाढू लागला आणि त्याचा मृत्यू झाला.