‘उत्तर प्रदेशात ‘सपा’ची सायकल पंक्चर होणार; दलितांची साथ मिळाल्याने भाजपचे कमळ फुलणार’

उत्तर प्रदेशात रामदास आठवले यांच्या सभांचा झंझावात

अलाहाबाद   – उत्तर प्रदेशातील दलित आदिवासी मागास वर्गीय अल्पसंख्यांक बहुजनांचे हित साधण्यासाठी भाजपच्या हाती सत्ता देणे योग्य आहे मंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील माफिया गुंडाराज संपवला आहे.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. अलाहाबाद प्रयागराज येथील कोशामबी मतदारसंघात भाजप चे उमेदवार उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मोर्या यांच्या प्रचार सभेत  रामदास आठवले बोलत होते.

उत्तर प्रदेशातील दलितांनी बसपाला पसंतीचे मत देण्यापेक्षा भाजपला साथ द्यावी बसपाने दलित समाजाच्या हितासाठी कोणतेही सामाजिक काम केले नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात देशभर दलित हिताचे निर्णय होत आहेत. दलितांनी भाजपला साथ द्यावी आणि उत्तर प्रदेशात भाजपला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन  रामदास आठवले यांनी केले.

निवडणूक आली की बसपाला दलित मतांची आठवण होते .केवळ राजकारणासाठी दलित मतांचा वापर बसपा करीत आहे .उत्तर प्रदेशातील दलितांनी बसपाला सोडून भाजपला साथ द्यावी. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी च्या सायकल ची हवा हळूहळू निघत आहे येत्या दहा मार्च पर्यंत समाजवादी पार्टी ची सायकल पूर्ण पंक्चर होणार आहे . उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दलित मतांच्या साथीमुळे भाजपचे कमळ निश्चित फुलणार आहे असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले मित्रपक्ष भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचा दौरा करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी लखनऊ आयोध्या प्रयागराज आलाबाद कोसंबी येथे प्रचंड सभा आणि यात्रा केले असून येत्या 28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत महाराजा गंज येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. उत्तर प्रदेशात नामदार रामदास आठवले यांच्या सर्वांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांकडून जाहीर सभांसाठी रामदास आठवले यांना निमंत्रण दिले जात आहे.