खुशी कपूर (Khushi Kapoor) तिची बेस्ट फ्रेंड आलिया कश्यपच्या लग्नात खूप एन्जॉय करत आहे. खुशी सोशल मीडियावर प्रत्येक फंक्शनचे फोटो शेअर करत असते. आलियाच्या कॉकटेल पार्टीत खुशीने खूप एन्जॉय केला.
प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी खुशी कपूरने (Khushi Kapoor) पारंपारिक लूकमध्ये कहर केला. प्रत्येक वेळी तिच्या लूकवर प्रयोग करण्यात ती कमी पडत नाही. यावेळीही तिने असेच काहीसे केले आहे. खुशीच्या लूकवरुन तुमची नजर हटणार नाही.
खुशीने तरुण तेहलानीच्या कलेक्शनमधील गोल्डन कलरची साडी घातली होती. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिचा ब्लाउज भारी भरतकामाचा होता. तसेच, तिची पल्लू फ्लोर लेंथचा होता. खुशीच्या या साडीची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल. तिच्या या साडीची किंमत 4,59,900 लाख रुपये आहे. साडीची किंमत ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
खुशीने सोनेरी रंगाच्या बॅगसह तिचा लूक पूर्ण केला आहे. तिने या कार्यक्रमाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती पोज देताना दिसत आहे.
चाहते खुशीच्या फोटोंवर कमेंट करणे थांबवत नाहीत. एका युजरने लिहिले- जबरदस्त. तर दुसऱ्याने लिहिले – सर्वात सुंदर. खुशी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज काहीतरी शेअर करत असते.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून पदार्पण केले. द आर्चीजमध्ये खुशीसोबत सुहाना खान, वेदांग रैना आणि अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटानंतर खुशी कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना धक्का
“गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात
पवारांचा खोटारडेपणा म्हणजे संविधानाचा अपमान! बावनकुळे यांची टीका