श्रीकांत शिंदे युवा सेना अध्यक्ष होणार ?  एकनाथ शिंदेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष 

ठाणे : श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना युवा सेना अध्यक्ष करा, अशी मागणी बुलढाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केलीय. आपल्याला युवा सेनेचं काम वाढवायचं आहे. त्यासाठी श्रींकात शिंदे यांना लवकरात लवकर युवा सेनेची जबाबदारी द्यावी, एवढी माझी मागणी आहे, असं वक्तव्य त्यांनी केलंय.

मंगळवारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची त्यांनी भेट घेतली होती. बुलडाण्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदेना युवासेनेचा अध्यक्ष करण्याची मागणी प्रतापराव जा यांनी यावेळी केली. इतकंच नव्हे तर खरी शिवसेना आमचीच आहे, असंदेखील त्यांनी यावेळी म्हटलं.

नायक चित्रपट सारखे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असं म्हणत प्रतापराव जाधव यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासमोरच ही मागणी केल्यानंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनादेखील याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदेंनी थेटपणे यावर भाष्य करणं टाळलं.