शिवसेनेच्या शाखेत प्रवेश करताच श्रीकांत शिंदेंना अश्रू अनावर

डोंबिवली : शिवसेनेतील फुटीनंतर डोंबिवलीच्या मध्यवर्ती शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. मात्र आता शिंदे गटाकडून ही शाखा कायदेशीररित्या आपल्या ताब्यात घेण्यात आली. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध कामाच्या भूमीपूजनासाठी डोंबिवलीत आले असता ते या मध्यवर्ती शाखेत आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते.

दरम्यान, या शाखेत आल्याने श्रीकांत शिंदे हे काहीसे भावुक झाल्याचं पाहायला मिळाले.खासदार श्रीकांत शिंदे यांनी तब्बल सात ते आठ महिन्यांनंतर डोंबिवलीच्या मध्यवर्ती शाखेत प्रवेश केला. ते शाखेच्या पायरीवर नतमस्तक झाले. यावेळी श्रीकांत शिंदे यांना अश्रू अनावर झाले. याबाबतचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.