राजीनाम्यानंतर कोण घेणार संघ निवडकर्ता चेतन शर्मांची जागा? भारतीय सलामीवीराचे नाव आघाडीवर

Team India: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे (Chetan Sharma Sting) भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप आला होता. फिटनेससाठी इंजेक्शन, खेळाडूंच्या वैयक्तिक गोष्टी आणि विवादांबद्दलची माहिती चेतन शर्मा यांनी सार्वजनिक केली होती. त्यामुळे त्यांना मुख्य निवडकर्ता पदावरुन हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता. अखेर १७ फेब्रुवारी रोजी चेतन शर्मा यांनी स्वत: आपल्या पदाचा राजीनामा (Chetan Sharma Resigns) दिला आहे. त्यांनी बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांच्या राजीनामा दिला असून त्यांनी तो स्विकारलाही आहे.

आता बीसीसीआय नव्या अध्यक्षाच्या शोधात आहे, ज्यांचे पहिले लक्ष्य हे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांवर असेल. जानेवारीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. अशात आता उर्वरित दोन सामन्यांसाठी संघाची निवड होणे बाकी आहे.

चेतन शर्मांच्या पायउतारानंतर मुख्य निवडकर्ता पदासाठी एक नाव चर्चेत आहे. चेतन यांच्या जागी भारतीय संघाचे माजी सलामीवीर शिव सुंदर दास (Shiv Sundar Das) यांची अंतरिम संघ निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. त्यांनी सध्याच्या निवड समितीमधील सदस्यांपैकी सर्वाधिक २३ कसोटी सामने खेळले आहेत.  तसेच, ते (SS Das) सध्याच्या पाच सदस्यीय पॅनेलचे सदस्यही आहेत.