एसटी कामगारांच्या संपातून पडळकर-सदाभाऊंचा काढता पाय ?, आझाद मैदानावरील आंदोलन स्थगित केल्याची घोषणा

मुंबई : गेल्या 17 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सरकारने एक पाऊल पुढे येत एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐतिहासिक पगारवाढीनंतरही काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठी घोषणा केल्यानंतरही संपावर तोडगा निघाला नाही. सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 41 टक्के वाढ करणार असल्याची घोषणा केलीय.

त्यानंतर आता आझाद मैदानावर सुरु असणारे आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ‘हे जे आंदोलन आहे ते राज्यातील एसटी कामगारांनी सुरु केलं होतं. आम्ही दोन्ही लोकप्रतिनिधींनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. वेळेत पगार दिला पाहिजे, सातवा वेतन आयोगाप्रमाणं वेतन मिळावं, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची होती. सरकारनं याकडे लक्ष दिलं नव्हतं. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी केली होती. सरकार कामगारांकडे लक्ष देत नव्हतं त्यामुळं आम्ही आझाद मैदानावर ठाण मांडून बसलो.

15 दिवसानंतर सरकारला जाग आली. न्यायालयीन लढा वकील लढत आहेत. न्यायालयीन लढा होईपर्यंत सरकारनं तोपर्यंत पगार वाढवून देण्याचा निर्णय घेतला. हा पहिला टप्पा आहे. 17 हजार पगार मिळणाऱ्या कामगारांना 24 हजारांवर गेला आहे. ज्या कामगारांना 23 हजार मिळत होता त्यांना 28 हजारांपर्यंत पगार मिळणार आहे. ही वाढ मूळ वेतनात होणार आहे. हा कामगारांच्या पहिल्या टप्प्यातील विजय आहे.’ अशी भूमिका सदाभाऊ खोत यांनी मंडळी आहे.

तर, राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार कमी पडणारी रक्कम देणार आहे. दोन पावलं सरकार पुढं आलं आहे. पहिला टप्पा जिंकलो आहे. न्यायालयातून जो निर्णय येईल. आम्ही दुसऱ्या टप्प्यात कामगारांनी आंदोलन केल्यास आम्ही त्यांच्यासोबत राहू. निलंबन आणि सेवासमाप्ती मागं करण्याचा निर्णय घेतला आहे. आज 12 पर्यंत कामगारांनी कामावर हजर व्हावं, असं सदाभाऊ खोत म्हणाले.

हे देखील पहा