State Kabaddi Association | कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देणार, उपमुख्यमंत्री पवारांची ग्वाही

State Kabaddi Association | कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देणार, उपमुख्यमंत्री पवारांची ग्वाही

राष्ट्रीय क्रीडा संहितेचे राज्य कबड्डी असोसिएशन ( State Kabaddi Association) कार्यकारिणीने काटेकोरपणे पालन करावे व त्यानुसार राज्यस्तरीय निवडणूक पार पाडावी. तसेच कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्या.

दरम्यान कबड्डी खेळ रूजवावा-वाढवावा व कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन (State Kabaddi Association) सल्लागार समिती व कार्यकारिणीच्या बैठकीचे आज दादर शिवाजी पार्क येथील कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव साळवी सभागृहात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष, आमदार भाई जगताप, उपाध्यक्ष दिनकर पाटील, राज्य उपाध्यक्षा शकुंतला खटावकर, सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, खजिनदार मंगल पांडे, सहकार्यवाह रविंद्र देसाई यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आणि असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसांच्या रकमा वाढविण्यात आल्या आहेत. खेळांना महत्व प्राप्त व्हावे यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. ग्रामीण भागात कबड्डी जास्त रूजली आणि वाढली असल्याने आमदार निधी, जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जातो. कबड्डी खेळाला सुवर्ण दिवस आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. राष्ट्रीय संहितेनुसार कार्यकारिणी निवडणूक घेण्यात यावी. स्पोर्ट्स कोडचे पालन करण्यात यावे. २१ जून रोजी नव्याने होणाऱ्या कार्यकारिणीसाठी निवडणूक होणार असून, १९ जून ही जिल्हानिहाय मतदारांची नावे स्विकारण्याची अंतिम तारीख असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Real Life | प्रत्येक मुद्द्यावरुन दीराशी होतात वाद? नात्यात गोडवा आणण्यासाठी या टिप्स उपयुक्त ठरतील

प्रत्येक मुद्द्यावरुन दीराशी होतात वाद? नात्यात गोडवा आणण्यासाठी या टिप्स उपयुक्त ठरतील

Next Post
Sunil Tatkare | तुमच्या ताकदीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात शक्तिशाली बनवायचं आहे

Sunil Tatkare | तुमच्या ताकदीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात शक्तिशाली बनवायचं आहे

Related Posts
सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीसाठी दिलेली सशर्त परवानगी ही सर्वांसाठी आनंदाची बातमी - जयंत पाटील

सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीसाठी दिलेली सशर्त परवानगी ही सर्वांसाठी आनंदाची बातमी – जयंत पाटील

मुंबई  – सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीसाठी सशर्त परवानगी दिली आहे. ही बातमी आपल्या सर्वांसाठी आनंदाची असून या निर्णयाचे…
Read More
सुप्रिया सुळे

भाजपाने प्रताप सरनाईकांना ब्लॅकमेल केले; सुप्रिया सुळे यांचा आरोप

मुंबई :  आमदार प्रताप सरनाईक(Pratap Sarnaik) यांच्या मागे लागलेली ईडीची पिडा कमी होणार असल्याची चर्चा आहे. ईडीकडून केस…
Read More

Pankaja Munde: ‘मलाही मराठी म्हणून मुंबईत घर नाकारण्यात आलं’, पंकजा मुंडेंनी सांगितला जुना अनुभव

Mulund Incident: मुंबईतील मुलुंड भागात कार्यालयासाठी भाड्याने जागा घेण्यासाठी गेलेल्या मराठी तरुणीला `इथे महाराष्ट्रीयन लोकांना जागा नाही`, असे…
Read More