Rahul Gandhi | राहुल गांधीकडून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची दिशाभूल ?

४ जूनच्या शेअर बाजारातील घसरणीची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काल केली. नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात माध्यमांना संबोधित करताना गांधी म्हणाले की या घसरणीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांचं 30 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या पाच कोटी कुटुंबांना गुंतवणुकीचा विशिष्ट सल्ला का दिला हे जाणण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, भाजपने काँग्रेसचे दावे फेटाळून लावले आहेत.

राहुल गांधी (Rahul Gandhi) बाजारातील गुंतवणूकदारांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते पियुष गोयल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केला. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीही लोकांना फायदा झाला आहे असं प्रतिपादन गोयल यांनी केलं. परदेशी लोकांचे नुकसान झाले आहे तर भारतीय गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे, 10 वर्षांपूर्वी यूपीए सरकारच्या काळात देशाचं बाजारातील भांडवल 67 लाख कोटी रुपये होतं आणि आज तेच 415 लाख कोटी रुपयांवर गेलं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप