झेंडा काढल्याच्या वादावरुन अमरावतीत दोन गटात तुफान दगडफेक, संचारबंदी लागू

अमरावती – अमरावती (amravati) जिल्ह्यातील अचलपूर (achalpur) शहरात काल (17 एप्रिल) रात्री 9:30 वाजेच्या सुमारास दुल्ला गेट परिसरातील एक झेंडा काढल्याचा वादावरून दोन गटात हिंसाचार (Violence) झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात बराच वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेची माहिती मिळताच प्रकरण अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगविला.

यानंतर पोलिसांनी अचलपूर आणि परतवाडा (Paratwada) येथील बंदोबस्त देखील वाढवला आहे. सध्या अचलपूर आणि परतवाडा या दोन्ही शहरात संचारबंदी (Section 144) लागू करण्यात आली आहे. याशिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक सुद्धा बोलवण्यात आली आहे.(Amravati riots)

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री 10 च्या सुमारास अचानक झालेल्या वादानंतर अमरावतीच्या अचलपूर आणि परतवाडा शहरात जमावबंदी (Curfew) लागू करण्यात आली आहे. अचलपूर शहरातील दुल्ला गेट (Dulla Gate) परिसरात झेंडा काढल्याच्या वादातून दोन गट आमने सामने आले आणि वातावरण तापलं. मात्र पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

सध्या दोन्ही शहरात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून संचारबंदी सदृश्य स्थिती आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलिसांची तुकडी (Additional police squad) सुद्धा बोलवण्यात आली आहे.