जेव्हा रवी शास्त्री जावेद मियांदादच्या मागे बूट घेऊन पळाला होता…

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटर रवी शास्त्री हे फक्त भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक नाहीत तर समस्त मिम बनवणाऱ्या कार्यकर्त्यांचे मटेरीअल सुद्धा आहेत. अनेकदा रवी शास्त्री हे नेटकऱ्यांच्या चेष्ठेचे विषय बनत असतात. हे शास्त्री यांना देखील ठावूक असून ते नेहमी अशाप्रकारच्या विनोद बुद्धीचे कौतुकच करतात.

पण कार्यकर्त्यांनो तुम्हाला माहित आहे का ? तुम्ही ज्यांच्यावर विनोद बनवता त्याच रवी शास्त्रीने पाकिस्तानचा ‘किडे’खोर क्रिकेटपटू जावेद मियांदादची इतभर फाडली होती. नसेल माहिती तर हा किस्सा नक्की वाचा…

शास्त्री गुरुजींनी त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘स्टारगॅझिंग’ या पुस्तकात क्रिकेटशी संबंधित अनेक मनोरंजक किस्से लिहिले आहेत. आणि यातीलच एक कथा पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियांदाद यांच्याशी संबंधित आहे.

साल होतं १९८७ पाकिस्तान संघ पाच कसोटी आणि सहा एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारतात आला होता. 20 मार्च रोजी दोन्ही संघांमधील तिसरा एकदिवसीय सामना हैद्राबाद येथे खेळला गेला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या फास्टर बॉलर समोर भारताच्या सालामीविरांचा निभाव लागला नाही. लिटील मास्टर सुनील गावस्करला वासिम अक्रमने अवघ्या एका धावत तंबूत धाडले तर के.श्रीकांत रिटायर्ड हर्ट झाले.

पण रवी शास्त्रीच्या 69 आणि कर्णधार कपिल देवच्या 59 धावांमुळे भारतीय संघाने 44 षटकांत 212 धावा केल्या. आता पाकडे धावांचा पाठलाग करायला आले. पाकिस्तानला चांगली सुरुवात मिळाली पण सामना शेवटपर्यंत चालला. सामन्याच्या शेवटच्या चेंडूत पाकिस्तानला विजयासाठी दोन धावांची गरज होती. अब्दुल कादिर स्ट्राईकवर होता त्याने पहिला रन काढला आणि दुसरा रन काढताना कादिर आउट झाला.

मॅच टाय झाली, पण इंग्लडच्या वर्ल्ड कप विजया सारखा पण थोडासा वेगळा नियम तेव्हा देखील होता. ज्याचे कमी गडी बात तो जिंकला… भारताने 6 गड्यांच्या बदल्यात २१२ रन केले होते. आणि पाकड्यांनी इतक्यातच धावा काढताना पाकड्यांचे 7 गाडी बाद झाले होते. त्यानुसार भारताला विजयी घोषित केले.

मॅच हरल्यानंतर तिकडे पाकिस्तानमध्ये रिडीओ फुटले असतील ( तेव्हा पाकिस्तानकडे टीव्ही असतील यावर तुम्ही विचार करून अंदाज लावा ) आणि इकडे हैद्राबादमध्ये वर लिहिल्याप्रमाणे पाकड्यांचा ‘किडे’खोर क्रिकेटपटू याच्या जावेद मियांदादच्या अंगातील किडा जागा झाला जावेद मियांदाद भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आला आणि जोरात ओरडला ‘चीटिंग करून जिंकले तुम्ही’.

मग काय गरम डोक्याच्या शास्त्री गुरुजींचं डोक अजूनच तापलं ते तडक उठले अन् बाजूला पडलेला बूट उचलला. बूट उचलताच मियांदाद थेट आपल्या ड्रेसिंग रूमकडे पळाला रवी शास्त्री हे सुद्धा त्याच्या मागे-मागे पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये घुसले. पण वातावरण तेव्हाचे पाकिस्तानचे कर्णधार आणि आजचे पंतप्रधान इम्रान खान यांनी थंड केलं. पुढे दोन्ही संघातील खेळाडूंनी हा विषय तिथच दाबला.

पुढची मॅच पुण्यात होती. त्यावेळी विमान प्रवासात शास्त्री आणि मियांदाद शेजारी शेजारी बसले अन् ‘जाऊदे ना भावा’ म्हणत विषय मिटवला. त्यानंतर हा विषय ना या दोघांनी कुठे काढला ना इतर खेळाडूंनी… पण रवी शास्त्री यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून साऱ्या जगाला आता मियांदादच्या मागे बूट घेऊन पाळलेले रवीभाई समजले आहेत.

हे देखील पहा