कोरोना काळात मदत न करणाऱ्या महाविकास आघाडीला झटका द्या – चंद्रशेखर बावनकुळे

पुणे – कोरोनाचे (Corona) संकट असताना महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांनी लोकांना मदत करण्याऐवजी दारूवरील कर कमी केला. कोरोना काळात जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या महाविकास आघाडीला येणाऱ्या निवडणुकीमध्ये धक्का द्या असं आवाहन भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केले.

कसबा विधानसभा मतदारसंघात (Kasba Assembly Constituency) महिला बचत गट मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी माननीय चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या प्रचारासाठी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध ठिकाणी मेळावे घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली आहे. मोदीजींना साथ द्यायची असेल तर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये हेमंत रासने यांना मतदान द्या, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरही निशाणा साधला. कोरोनाच्या काळात संकट असताना त्यांनी जनतेला मदत केली नाही. लसीकरणासाठी पैसे नाहीत असे सांगितले. मात्र दुसरीकडे दारू वरील करात सूट दिली. त्यामुळे अशा नेत्यांना धक्का दिला पाहिजे असा आवाहन त्यांनी केले.