जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची जबरदस्त कामगिरी; चार दहशतवादी ठार

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी काल रात्रभरात तीन वेगवेगळ्या कारवाईत चार दहशतवादी ठार केले. पुलवामा इथल्या चेवक्लान भागात झालेल्या चकमकीत पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार झाले.

पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आणखी एक दहशतवादी गांदरबल जिल्ह्यातील सेर्च भागात झालेल्या चकमकीत ठार झाला. पोलिसांनी सांगितलं की, हंदवारा इथल्या नेचामा, राजवार भागात झालेल्या चकमकीत एलईटीचा आणखी एक दहशतवादी मारला गेला.

काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलं की सुरक्षा दलांनी शुक्रवारी रात्री चार ते पाच ठिकाणी संयुक्त कारवाई सुरू केली होती. सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला जिवंत पकडले आहे. हंदवाडा आणि पुलवामा इथल्या चकमकी संपल्या आहेत.