राज्यात पावसाची दमदार हजेरी; धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ

पुणे – पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चारही धरणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ (Large increase in the water level of the dam) झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर काल रात्रीपासून खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चारही धरणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर काल रात्रीपासून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. काल 856 वेगानं सुरू केलेला विसर्ग वाढवून आज सकाळी सहा पासून 2568 क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

दरम्यान शहरत सुरू असलेल्या पावसामुळे काल सोमवार पेठेतील बोळे वाडा इथं पहिल्या मजल्यावरील घराचा काही भाग कोसळला. काल संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पुण्यात 16 ठिकाणी झाड पडल्याची नोंद अग्निशमन दलाकडे झाली. या सर्व घटनांमधे कोठेही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. पुणे शहरात काल दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालं होतं. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. त्यामुळे शहरात बहुतांश रस्त्यांवर वाहतूकीची कोंडी पाहायला मिळाली. पुणे आणि परिसरात आजही मध्यम ते जोरदार पाउस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.

नाशिक आणि कोल्हापूर (Nashik and Kolhapur) पावसाचा जोर कायम असून नाशिकमधल्या गंगापूर, दारणा, नंदुरमध्यमेश्वर, पालखेड (Gangapur, Darna, Nandurmadhyameshwar, Palakhed) अशा जवळपास सर्वच धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कोल्हापूरमध्ये पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली असून 44 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नृसिंहवाडी इथल्या मंदिराच्या गाभाऱ्यात पुराचं पाणी पोहोचलं असून काल रात्री तीन वाजता चढता दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला.

दरम्यान, राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील जिल्हे, तसंच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, धुळे इथं मुसळधार पावसाने नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने भामरागड, अहेरी आणि सिरोंचा इथले कित्येक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी काल गडचिरोलीचा तातडीचा दौरा केला. दरवर्षी पावसामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं.