राज्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन 872 वातानुकूलित शिवशाही बसेस सेवा (Shivshahi Buses Service) पुरवण्यासाठी सज्ज आहेत. एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 2,640 नवीन ‘लाल परी’ बसेस दाखल होणार असून, दर महिन्याला 300 बसेस टप्प्याटप्प्याने सेवेत येणार आहेत. त्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणावर प्रवासी एसी बसेसकडे (Shivshahi Buses Service) वळत आहेत. त्यानुसार, शिवशाही बसेसव्यतिरिक्त जादा लाल परी बसेसही सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
देवेंद्र फडणवीस आणि बिल गेट्स यांची मुंबईत बैठक; ‘या’ विषयांवर झाली चर्चा